
कोरोना विरोधातील लढाईमध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांना सेवा देणाऱ्या आणि सर्वसामान्यांना जीवनावश्यक गोष्टी पुरवणाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी शंखनाद, थाळीनाद व घंटानाद करण्यात आला. रविवारी सायंकाळी 5 वाजता आपापल्या घरात व बालकनीत येऊन नागरिकांनी थाळी नाद, घंटानाद, शंखनाद करत टाळ्या वाजवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीआवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला पेणमधील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. नागरिकांनी थाळीनाद, घंटानाद करून अत्यावश्यक सेवा देणार्यांचे आभार मानले आहेत. तर काहीजणांनी गो कोरोना अशा घोषणा दिल्या. कोरोनाविरोधात सर्व जनता शासनाच्या पाठीशी असून कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्याचा निर्धार यावेळी नागरिकांनी व्यक्त केला.




























































