संचारबंदी दरम्यान गुटखा पुरवठा करणाऱ्यांवर नवघर पोलिसांची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

संचारबंदीचा फायदा घेत भाईंदर येथील दुकानदारांना चोरीच्या मार्गाने गुटखा पुरवठा करणाऱ्या जयेश शर्मा नामक इसमाला नवघर पोलिसांनी बुधवारी रात्री १० वाजता भाईंदर पूर्व येथील कस्तूरी पार्क येथून गुटख्यासह अटक केली आहे.

पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे ८५ हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला. नवघर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कस्तुरी पार्कमध्ये कस्तुरी आर्केड नावाच्या इमारतीतील तळमजल्यावर राहणारा जयेश बुधवारी रात्रीच्या सुमारास आपल्या अॅक्टिवा स्कुटरवरून शहरात ठिकठिकाणी गुटखा पुरवठा करण्याकरता जात असल्याची माहिती नवघर पोलिसांना मिळाली. त्यावेळी तेथे गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्याला अडवुन त्याच्या दुचाकीची तपासणी केली असता त्यात सुमारे ८५,००० रुपयांचा गुटखा आढळून आला. पोलिसांनी जयेशला अटक करून त्याच्याजवळील गुटखा व स्कुटर जप्त केली आहे. याप्रकरणी नवघर पोलिस ठाण्यात जयेशवर गुन्हा नोंद करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश बिराजदार यांनी सांगितले.