
सध्याची स्थिती बघता कोणत्याही घरमालकानं भाडेकरूला घराबाहेर काढू नये आणि महिनाभराचं घरभाडंही घेऊ नये, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यानी दिले. गावपातळीपर्यंत या निर्देशाचं पालन व्हावं आणि ज्यांनी याचा भंग केला, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असंही जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांनी म्हटलं आहे.
घरमालकांकडून भाडेकरूंना घरभाडे मागितले जात असेल किंवा घर रिकामे करून मागितले जात असेल, तर त्याची स्थानिक प्रशासनाकडे तक्रार करावी, असं आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय.

























































