
वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाने सांगलीकरांना आज झोडपून काढले, काही भागात गारपीट झाली त्यामुळे द्राक्ष आणि आंबा बागायतदार पूर्णपणे धास्तावला आहे.
आज दिवसभर उन्हाची तीव्रता अधिक होती, सायंकाळी चार वाजता अचानक ढगांनी गर्दी केली आणि वादळी वाऱ्यासह पावसाने बरसायला सुरुवात केली. सांगली-मिरज या शहराबरोबरच जिल्ह्याच्या अनेक भागात आज अवकाळी पावसाने हजेरी लावली तर काही भागात गारपीट झाली. वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्याच्या काही भागात झाडे उन्मळून पडली . अचानक आज अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने हातातोंडाशी आलेला आंबा वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे तर लॉक डाऊन मुळे ग्राहकांच्या प्रतीक्षेत असलेल्या द्राक्षबागा या पावसामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे
























































