कोरोना लॉकडाऊनमुळे पतसंस्थांची आर्थिक कोंडी; व्यवहारावर परिणाम, वसुलीही खुंटली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना प्रतिबंधक उपाययोजना म्हणून केलेल्या लॉकडाऊनचा फटका संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व 4693 सहकारी पतसंस्थांनाही बसला आहे. पतसंस्थांची वसुली तुंबल्यामुळे आगामी काळात सर्वच पतसंस्थांना मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागणार आहे.

शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांना आर्थिक पतपुरवठा करून त्यांना आपल्या पायावर उभे करण्यासाठी स्थापन केलेल्या 300 पेक्षा अधिक पतसंस्था या गोरगरीब नागरिकांबरोबरच छोट्या उद्योग व्यवसायिकांनाही पतपुरवठा करीत असतं. काही पतसंस्था या पिग्मी पध्यतीने त्याचे हप्ते गोळा करीत. या पतसंस्था ग्रामीण अर्थकारणाचा कणाच बनल्या आहेत.

मात्र कोरोनाच्या महामारीमुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. लॉकडाऊनमुळे कर्जदार छोट्या उद्योगांचे धंदे बंद आहेत. वसुलीही बंद आहे. घरातच रहावे लागत असल्यामुळे एकुणच अर्थचक्र बंद पडले आहे. त्याचा परिणाम या पतसंस्थांच्या व्यवहारावर झाला आहे. पतसंस्थांची कोंडी झालेली आहे. सहकारी तत्वावर होणारे एकुणच सहकार्य संकटात सापडले आहे.