ठाण्यातील 38 पत्रकारांची ‘कोरोना’ चाचणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘कोरोना’ च्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने ठाण्यातील 38 पत्रकार, छायाचित्रकार, कॅमेरामन यांची चाचणी करण्यात आली. या चाचणीत त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. फिल्डवर रिपोर्टिंग करताना कोणती काळजी घयावी याच्या काही टिप्स पत्रकारांना तज्ज्ञ डॉक्टरांनी दिल्या. कोरोनाने जगभरात हाहाकार माजवला आहे. अशा परिस्थितीतही प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकार, छायाचित्रकार, कॅमेरामन यांना आपला जीव धोक्यात घालून काम करावे लागते. पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाणे शहरातील पत्रकार, छायाचित्रकार, कॅमेरामन अशा 38 जाणांची तातडीने चाचणी केली होती. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या कमिटीने खासदार शिंदे यांचे आभार मानले आहेत.