
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दुसऱ्या लॉकडाऊन ची घोषणा केली त्यानुसार आता तीन मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाकडून देखील महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्यात आल्याने देशातील सर्व रेल्वे या तीन मेपर्यंत बंद ठेवण्यात येतील अशी घोषणा रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आली आहे.
या काळात प्रवाशांनी आरक्षण करून ठेवले असल्यास ते रद्द होणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.
लॉक डाऊन दोन मुळे आता तीन मेपर्यंत कोणत्याही प्रकारचे आरक्षित किंवा अनारक्षित तिकीट या कालावधीत उपलब्ध होणार नाही तसेच रेल्वे स्टेशन परिसरात किंवा अन्य ठिकाणचे तिकीट काऊंटर या कालावधीत बंद असतील.
दरम्यान या कालावधीमध्ये अत्यावश्यक सेवा म्हणजेच भाजी भाजीपाला दूध पेट्रोल डिझेल वाहून नेणाऱ्या मालगाड्यांची वाहतूक मात्र सुरू राहणार आहे.




























































