
सोलापुरात पाच्छा पेठमध्ये कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर त्याच्याशी संबंधित 94 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. यापैकी आज दुपारी बारा वाजेपर्यंत 67 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 66 जणांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आलीआहे. तर एक महिला कोरोना पॉझिटिव्ह मिळाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. उर्वरित चाचणी अहवाल सायंकाळपर्यंत येतील असेही त्यांनी सांगितले.
लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. प्रशासनाला सहकार्य करावे. तपासणी करण्यास येणाऱ्या कर्मचाऱ्यांना माहिती द्यावी, असेही आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. दोन दिवसापूर्वी एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला असून आणखी काही रुग्णांचे अहवाल प्राप्त होणार असल्याने सोलापूरकरांची धाकधूक वाढली आहे.


























































