चहा नाही दिला म्हणून दिला तिहेरी तलाक, बाळासह पत्नीला काढले बाहेर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बायकोने चहा नाही दिला म्हणून पतीने आपल्या पत्नीला तिहेरी तलाक दिला आहे. इतकेच नाही तर तिला आणि मुलाला बाहेर काढले आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यात दरकशा आणि हाजी अफजल यांचे तीन वर्षापूर्वी लग्न झाले होते. दोघांना दोन वर्षाचा मुलगाही आहे. लॉकडाऊनमुळे पती हाजी अफजल घरीच आहे. अफजले पत्नी दरकशाकडे चहा मागितला. तेव्हा दरकशा बाळासाठी बाटलीत दूध भरत होती. त्यामुळे दरकशाला लगेच चहा देता नाही आला. तेव्हा पती महाशयांना याचा चांगलाच राग आला. तेव्हा अफजले लगेच तिला तिहेरी तलाक देत तिला आणि बाळाला बाहेर काढले. दरकशाचे माहेर लखनौमध्ये आहे. लॉकडाऊनमध्ये तिला माहेरी जाता येत नसल्याने ती सध्या नातेवाईकांच्या घरी राहिली आहे.

पतीने असह्य केले जीवन, लॉकडाऊन हटवण्याची पत्नीची मागणी

या प्रकरणी पोलिसांनी हाजी अफजलच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. केंद्र सरकारने तिहेरी तलाक रद्दबातल केली आहे. त्यानुसारच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.