उरणमध्ये आढळला तिसरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उरण येथील जासई रेल्वे कॉलनीमध्ये आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. याधीच उरणमध्ये दोन रुग्ण आढळून आले होते.त्यामुळे उरणमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता तीनवर पोहचली आहे.

उरण जासई रेल्वे कॉलनीमधील या रुग्णावर 11 एप्रिल रोजीपासुनच मुंबईतील जगजीवनराम इस्पीतळात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.यावेळी कोविड-19 ची चाचणी निगेटिव्ह आल्याने त्याला इस्पितळातुन डिस्चार्ज देण्यात आला होता. घरी आल्यानंतर पुन्हा त्रास होऊ लागल्याने सदर रुग्णास उपचारासाठी 13 एप्रिल रोजी पनवेल येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

तेथुन त्याची रवानगी मुंबईतील जगजीवनराम इस्पितळात करण्यात आली होती. तपासणीनंतर कोविड- 19 ची चाचणी 17 रोजी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांच्यावर जगजीवनराम इस्पितळातच उपचार सुरू आहेत. त्याच्या संपर्कात आलेल्या आठ जणांचीही करण्यात येत आहे.