हम जितेंगे… कुतुब मिनार, लाल किल्ला रोषणाईने झगमगले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून शनिवारी दिल्ली, कोलकाता येथील ऐतिहासिक वारसास्थळे दिव्यांनी झगमगून निघाली. लाल किल्ला, कुतुब मिनार, हुमायूंची कबर, मेटकाफ हॉल, कूचबिहार पॅलेस या वास्तूंवर रोषणाई करण्यात आली. कोरोनाविरोधाच्या लढाईत आम्ही जिंकणारच असा संदेश यावेळी देण्यात आला.

18 मार्च हा जागतिक वारसा दिन म्हणून साजरा होतो. यावर्षी कोरोनामुळे देश संकटात आहे. अशास्थितीत कोणीही पर्यटक ऐतिहासिक स्थळांना भेट देऊ शकत नाही. तसेच तिथे जागतिक वारसा दिनाचा कोणताही कार्यक्रम होऊ शकत नाही. या सर्व पार्श्वभूमीवर पुरातत्व सर्वेक्षण विभागाने जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधत देशातील प्रमुख स्मारके, वास्तूंना रोषणाई केली. कोरोना विरोधातील लढाईतील शिलेदार असलेले डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कर्मचारी आणि प्रशासन यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दिवे लावण्यात आले. लाल किल्ल्यावर दिव्यांनी तिरंगा साकारण्यात आला. त्यासोबत ‘हम जितेंगे’ ही दिव्यांची अक्षरेही झळाळून निघाली. 41 दिवसांच्या लॉकडाऊनचे प्रतिक म्हणून हुमायूंची कबर येथे 41 मेणबत्त्या पेटवण्यात आल्या. यावेळी कुतुबमिनारच्या अधिकाऱयांसमवेत शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी प्रतिज्ञा घेतली. युनेस्कोच्या वारसा यादीत असलेली दिल्लीतील कुतुब मिनार ही वास्तू ‘घरी रहा, सुरक्षित रहा’ असा संदेश देत उजळली.