मी निशा जिंदल…सध्या मी पोलीस कोठडीत आहे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फेसबुकवर गेल्या आठ वर्षांपासून निशा जिंदल या नावाने वावरणाया तरुणाचे बिंग फुटले आहे. गेल्या आठ वर्षांपासून तो जातीय तेढ निर्माण करणाया पोस्ट करत होता. पोलिसांनी त्याला बेडया ठोकल्यानंतर ’मी पोलीस कोठडीत आहे… मीच निशा जिंदल आहे’ अशा प्रकारची पोस्ट पोलिसांनी त्याला करायला सांगितली आहे.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ठगाचे नाव रवी पूजार असून तो छत्तीसगढच्या रायपूर येथे राहणारा आहे. गेल्या 11 वर्षांपासून तो अभियांत्रिकेच्या परीक्षेत नापास होत आहे. या घटनेविषयी माहिती देताना पोलिसांनी सांगितलंय, निशा जिंदल नावाची महिला सातत्याने समाजात तेढ निर्माण करणारी पोस्ट करत असल्याची तक्रार गेल्या काही दिवसांपूर्वी  आमच्याकडे आली होती. आम्ही त्या आयडीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. 10 दिवस लक्ष ठेवल्यानंतर त्याला ताब्यात घेतले. तो एक पोस्ट केल्यानंतर मोबाईल बंद ठेवायचा. त्यामुळे पोलिसांना त्याचे लोकेशन ट्रेस करायला वेळ लागत होता.  2009 मध्ये त्याने एका स्थानिक खासगी कॉलेजमध्ये इंजिनिअरींगसाठी प्रवेश घेतला, पण अद्याप डिग्री मिळवू शकलेला नाही.

निशा जिंदल या आयडीवरून रवी पूजार एखाद्या मोठया अधिकायाप्रमाणे पोस्ट करायचा. मोठया संस्थेत उच्च पदावर कार्यरत असल्याचा दावा करायचा. ’मी आता 35 वर्षांची झाली असून अजून सिंगल आहे’. अशा प्रकारच्या पोस्ट पुरुषांना आकर्षित करण्यासाठी करायचा.  त्याच्या फ्रेंडलिस्टमध्ये अनेक मोठे अधिकारी होते.  पोलिसांनी त्याची अधिक चौकशी सुरू केली आहे. मुख्यमंत्री भूपेश बाघेल यांनी पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक केले आहे.