
जिल्ह्यातील 854 उद्योजकांनी ऑनलाईन परवान्यासाठी अर्ज केले असल्याची माहिती एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी धनंजय इंगळे यांनी दिली.
कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे .यामध्ये काही क्षेत्रात विशेष खबरदारी घेऊन काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. एमआयडीसी व सहकारी औद्योगिक वसाहतींत कामगारांची राहण्याची व्यवस्था कामाच्या ठिकाणीच करु शकणा-या उद्योगांनी मर्यादित स्वरुपात उद्योग सुरु करण्याबाबत http://permission.midcindia.org या संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले होते.कामगार व कर्मचारी यांच्यासाठी ग्रामीण भागात त्या-त्या विभागाचे अधिकारी अर्ज स्वीकारतील.तर अंतिम परवानगी ही तालुकास्तरावरुन तहसीलदार यांच्याकडून देण्यात येणार आहे.तसेच ग्रामीण भागातील उद्योग घटकांनी त्यांच्या कामगारांची सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून त्याच आस्थापना आवारात राहण्याची व्यवस्था करावयाची आहे.
सोमवारी जिल्ह्यातील 660 आणि आज 195 जणांनी उद्योग सुरु करण्याबाबत ऑनलाईन अर्ज केले आहेत.या एकुण 854 जणांना ॲटोजनरेटनुसार परवानगी मिळत आहे. उद्योगासाठी लागणाऱ्या वाहतुकीचा परवाना हा निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडून देण्यात येणार असल्याचे इंगळे यांनी सांगितले.































































