
लाखों भाविकांचे श्रद्धा स्थान असलेल्या अमरनाथ यात्रे संदर्भात जम्मू कश्मीर सूचना संचालनालयाने काढलेले पत्रक मागे घेतले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भात नवी माहिती जारी केली आहे. पुढील काळात कोरोना व्हायरसची स्थिती लक्षात घेऊन 2020 च्या अमरनाथ यात्रेच्या आयोजना संदर्भात निर्णय घेतला जाईल असे जम्मू कश्मीरच्या राजभवनच्या जनसंपर्क विभागाकडून कळवण्यात आले आहे.
आने वाले समय में कोरोना वायरस की स्थिति की समीक्षा के बाद अमरनाथ यात्रा 2020 के आयोजन पर फैसला लिया जाएगा: PRO, राजभवन, जम्मू-कश्मीर https://t.co/Spg6whG4qd
— ANI_HindiNews (@AHindinews) April 22, 2020
या आधी अमरनाथ यात्रा रद्द करण्यात येणार असल्याचे सूचना संचालनालयकडून सांगण्यात आले होते. मात्र अमरनाथ यात्रेला अजून पुष्कळ कालावधी आहे. त्यामुळे देशातील कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन मग पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे आता स्पष्ट करण्यात आले आहे.























































