नगर जिल्ह्यातील 41 व्यक्तींच्या स्त्राव चाचणी अहवालाची प्रतीक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे शुक्रवारी पाठविलेल्या 41 व्यक्तींच्या घशातील स्त्राव चाचणीचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली.

जिल्हा रुग्णालयाच्या वतीने आतापर्यंत 1483 व्यक्तींचे स्त्राव नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील 1381 व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 40 झाली आहे. यापैकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून 24 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.सध्या 690 व्यक्तींना त्यांच्या घरीच देखरेखीखाली ठेवण्यात आले असून 122 जणांना हॉस्पिटलमध्ये देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. यात जिल्हा रुग्णालयात 102, एआयएमएस मध्ये 6 व्यक्ती उपचार घेत आहेत. बूथ हॉस्पिटल मध्ये 14 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.