पोलिसांविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिवसरात्र रस्त्यावर उभ्या असलेल्या पोलिसांविरोधात लोकांच्या भावना भडकवणाऱ्या आक्षेपार्ह पोस्ट फेसबुकवर टाकणाऱ्या महिलेविरोधात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस हवालदार जयराज जयसिंगराव पाटणकर यांनी याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे.

लोणावळा शहरातील भांगरवाडी विभागातील एका 45 वर्षांच्या महिलेने मंगळवारी फेसबुकवर पोलिसांविरोधात नागरिकांच्या भावना भडकविणारी पोस्ट टाकली. बाहेरून आलेल्या लोकांना सोडून स्थानिकांना अडवून पोलीस नियम दाखवतात असे महिलेने म्हटले होते. तसेच पोलिसांवर टीका करून जनतेच्या मनात पोलिसांविषयी रोष उत्पन्न होईल, अशी विधीनेही पास्टमध्ये होती. त्याची दखल घेत याप्रकरणी अधिनियम 1922 चे कलम 3 प्रमाणे महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रियांका माने करीत आहेत.