
परभणी जिल्ह्यातील जिंतुर तालुक्यात रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे बामणी शिवारातील खडी कामगार आपल्या गावी परत जाणार नसल्याचे कामगारांनी सांगितले.
तालुक्यातील बामणी-कोलपा रस्त्याच्या कामावर खडी फोडण्याच्या कामासाठी हिंगोली, वाशिम जिल्ह्यातील वडार समाजातील जवळपास सव्वाशे कामगार दोन महिन्यांपासून मुलाबाळांसह आले आहेत. दरम्यान लॉकडाऊन घोषित झाल्याने सर्व मजूर बामणीपासून एक किलोमीटरवर रस्त्याच्या कडेला एका शेतात अडकले. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न झाल्याची माहिती समजली असता भोगाव देवी येथील सामाजिक कार्यकर्ते योगेश देशमुख भोगावकर व विठ्ठल देशमुख भोगावकर यांनी बुधवारी बामणी येथे जाऊन मजुरांची भेट घेऊन त्यांची चौकशी केली. तसेच काही मदत अपेक्षित असल्याबद्दल विचारले असता आमची पुर्ण व्यवस्था असून दोन तीन दिवसात काम सुरू होईल, असे मजुरांनी सांगितले.


























































