पुर्णेतील बिअरबारचे शटर वाकवून चोरी; 77 हजार रुपयांच्या विदेशी दारूसाठ्यावर डल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यासह पुर्णा तालुक्यातही सर्वत्र लॉकडाऊन, संचारबंदीसह कडक नाकाबंदी आहे. मात्र, अवैध देशी-विदेशी दारु, गुटखा,रेतीची वाहतूक करणारी वाहने शहरासह तालुक्यात फिरत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच पूर्णामध्ये चोरट्यांनी बिअरबारमध्ये चोरी करून मद्यासाठ्यावरच डल्ला मारल्याची घटना घडली आहे.

पूर्णा-झिरोफाटा रोडवरील सिटी प्राईड बिअरबार रेस्टॉरंट या बिअरबारचे शटर उचकवून चोरट्यांनी 77,015 रुपयांचा विदेशी दारुचा साठा पळवल्याची घटना गुरुवारी मध्यरात्रीनंतर घडली आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. सिटीप्राईड बिअरबार व रेस्टॉरंट मधील चोरीच्या घटनेत चोरट्यांनी विदेशी दारु इम्पारिअल ब्लू 203 बॉटल, रॉयल स्टेग 20 बॉटल, मॅगडॉल 38 बॉटल, मास्टर ब्लॅन्ड 48 बॉटल, ब्लॅन्डरच्या 10 बॉटल,सिग्निचरच्या 5 बॉटल असा एकूण 77,015 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळवला आहे. नाकाबंदी आणि पोलिसांचा बंदोबस्त असतानाही चोरीची घटना घडली आहे.