दौंडच्या राज्य राखीव पोलीस बलाच्या 8 जवानांना कोरोनाची लागण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. रस्त्यावर उतरून काम करणाऱ्यांमध्ये वेगाने संक्रमण पसरत आहे. पुणे पोलिसांनंतर आता बंदोबस्तासाठी गेलेल्या दौंड येथील राज्य राखीव पोलिस बलाच्या (गट क्रमांक 7) 8 जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे जवानांसह कुटुंबियांमध्ये खळबळ उडाली आहे.

राज्य राखीव पोलीस बलाची डी कंपनी आंतरराज्य सुरक्षा बंदोबस्तासाठी कोरोनाबाधित रेड झोनमध्ये कार्यरत होती. तेथील बंदोबस्त पूर्ण करून संबंधीत कंपनी 16 एप्रिलला दौंड येथील गट मुख्यालयात माघारी परतली. त्यानंतर त्यांना 14 दिवसांसाठी गट मुख्याल्यापासून 500 मीटर अंतरावर असलेल्या एका मंगल कार्यालयात क्वॉरंटाइन करण्यात आले. तसेच त्यांची वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या घशातील द्रवाचे नुमने तपासण्यासाठी पाठविण्यात आले. त्याचा अहवाल मिळाल्यानंतर 8 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. याबाबतची माहिती समादेशक श्रीकांत पाठक यांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दिली आहे.