
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहरात आज आणखी तीन जणांचा स्वॅबचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने नांदेडमधील रुग्णांची संख्या 34 झाली आहे. यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे.
गुरुद्वारा परिसरातील काही नागरिकांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील तीन जणांचा स्वॅब रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असून, हे तिघेही गुरुद्वारा परिसरातील आहेत. यामुळे नांदेडमधील रुग्णांची संख्या 34 वर पोहंचली आहे. त्यापैकी पीरबुमहाननगर, सेलू आणि रहेमतनगर येथील तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अद्यापही 62 स्वॅबचे अहवाल प्रलंबित असून, आज पॉझिटिव्ह निघालेल्या तिन्ही रुग्णांना कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान लंगर साहिब गुरुद्वारामधील कोरोना विषाणू संसर्गाच्या चार रुग्णांचा अद्यापही तपास सुरु असून, आज सायंकाळपर्यंत ते सापडले नाहीत.
































































