कोरोनाची लक्षणे आढळल्याने ऊसतोड मजुराला नगरला हलवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाथर्डी तालुक्यातील फुंदे टाकळी येथील एका ऊसतोड मजुरात करोना सदृश लक्षणे आज आढळली. त्यामुळे मजुराला तातडीने नगर येथे हलवण्यात आले आहे.

ऊस तोडण्यासाठी परगावी गेलेला एक तीस वर्षीय ऊसतोड मजूर पंधरा दिवसांपूर्वी फुंदे टाकळी या आपल्या गावी आला होता. आरोग्य विभागाने त्याला विलगीकरण कक्षात ठेवले होते. दररोज त्याच्या घरी जाऊन आशा स्वयंसेविका या मजुराच्या आरोग्याची माहिती घेत  होत्या. मात्र आज या मजुरात करोना सदृश लक्षणे आढळल्यानंतर त्याला तातडीने नगर येथे हलवण्यात आले. उद्या त्याचा अहवाल येणे अपेक्षित आहे. तालुक्यातील मोहोज देव्हडे येथील एका तरुणाला यापूर्वीच करोना ची लागण  झाली असून त्याच्यावर नगर येथे उपचार सुरू आहेत.

दरम्यान तालुक्यातून दरवर्षीच्या हंगामात जवळपास 40 हजार ऊसतोड मजूर राज्यासह परराज्यात उसतोडण्यासाठी जातात मात्र चालू वर्षी राज्यात उसाचे प्रमाण कमी असल्याने खूप कमी संख्येने ऊसतोड मजूर ऊस तोडण्यासाठी गेले होते. लॉकडॉऊन सुरु होण्यापूर्वी अनेक मजूर घरी  परतले मात्र लॉकडॉऊन सुरु झाल्या नंतर अनेक मजूर विविध कारखान्यावर अडकून पडले होते.