सोने खरेदीदारांसाठी मोठी बातमी, तीन दशकात पहिल्यांदा असं घडलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सोने बाजारावर परिणाम झाला आहे. शेअर मार्केट कोसळत असल्याने गुंतवणूकदारांनी सोन्याकडे मोर्चा वळवला आहे. हिंदुस्थान सोन्याचे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे मार्केट आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत एप्रिल महिन्यात सोन्याच्या आयातीत 99.9 टक्के घट झाली आहे.

एप्रिल महिन्यात फक्त 50 किलो सोने आयात करण्यात आले. सोन्याला सध्या उठाव नसल्याने तीन दशकात पहिल्यांदा असे घडले आहे. साधारणतः एप्रिल महिन्यात लग्नसराई आणि अक्षय्य तृतीया या सणामुळे सोन्याची मोठी मागणी असते, मात्र यंदा लॉकडाऊनमुळे खरेदीसाठी लोकांना बाहेर पडता आले नाही.

gold-price

सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील तीन दशकात पहिल्यांदा सोन्याच्या आयातीत घट झाली आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद असल्याने आणि देशात लॉकडाऊन सुरू असल्याने ही परिस्थिती ओढवली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच देशातील सोन्या-चांदीच्या दुकाना बंद आहेत, त्यामुळे सोने खरेदी बंद आहे.

gold-rate4

दुसरा सर्वात मोठा आयातदार
हिंदुस्थान जगातील सोन्याचा दुसरा सर्वात मोठा आयातदार आहे. परंतु एप्रिल महिन्यात फक्त 50 किलो सोने आयात करण्यात आले. गेल्या वर्षी याच काळात 110.18 टन सोने आयात करण्यात आले होते.

gold-rate

सोन्याचा दर कमी-जास्त
गेल्या काही दिवसात शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळत असल्याने सोन्याचा दरही कमी जास्त होत आहे. सध्या दिल्ली सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 46 हजार असून 22 कॅरेट सोन्याचा प्रति तोळा दर 44 हजार 560 रुपये आहे. येत्या काळात सोन्याचा दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.