हिंगोली शहरात कोरोनाचा रुग्ण आढळल्याने संपूर्ण शहर बंद, जिल्हा प्रशासनाचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंगोली शहरातील रिसाला बाजार परिसरातील एका परिचारिकेचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी रिसाला बाजार परिसरातील 3 कि.मी. पर्यंतचे क्षेत्र प्रतिबंधीत करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जिल्हा प्रशासनाच्या पुढील आदेशापर्यंत अत्यावश्यक सेवेची दुकानेही बंद राहणार असल्याने संपुर्ण हिंगोली शहरच बंद झाले आहे.

कंटेनमेंट प्लॅन अर्थात परिबंधननीती योजनेतील सुचनेनुसार रिसाला बाजार भागात कोरोनाचा रुग्ण आढळल्यानेव्ही या ठिकाणापासून 3 कि.मी. पर्यंतच्या परीसरात सर्व प्रकारच्या हालचालीस  पुर्णत: बंदी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले आहेत. त्यानुसार रिसाला बाजार  व चारही दिशांचा 3 किमीपर्यंतचा परिसर कंटेनमेंट झोन जाहीर झाला आहे. यामध्ये हिंगोली शहरातील आदर्श कॉलेज, रिसाला बाजारचा भाग गारमाळ, रिसाला, शिवाजीनगर, महसुल कॉलनी, बियाणी नगर, नारायण नगर,  बावनखोली, नगर परिषद वसाहत, शिवराज नगर, एन. टी.सी.  नाईक नगर इत्यादी भाग हे या प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये समाविष्ठ करण्यात आले आहेत. हा परिसराची संपुर्ण सीमाबंद करण्यात येत असून या भागात कोणतेही वाहन अथवा व्यक्ती यांना येण्याजाण्यास पुढील आदेशापर्यत पुर्णत: प्रतिबंधीत करण्यात आला आहे.

संचारबंदी कालावधीमध्ये  परवानगी घेतलेल्या व्यक्तीशिवाय इतर कोणतीही व्यक्ती रस्त्याने, बाजारमध्ये, गल्लीमध्ये, घराबाहेर फिरताना आढळुन आल्यास  कार्यवाही करण्याचा इशारा देण्यात आला आहे.