
दहावी बारावीचा निकाल कधी पर्यंत जाहीर होईल याविषयी सध्या तरी काही सांगता येणार नाही. उत्तरपत्रिका तपासणी समोरील संकटे काही केल्या संपत नाहीयेत. अनेक शिक्षक आपल्या मूळ गावी गेले आहेत. त्यातच शाळेपासून दूर राहणाऱ्या शिक्षकांना प्रवासासाठी वाहतूक व्यवस्था देखील नाही. त्यामुळे पेपर कसे आणि केव्हा तपासायचे असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकांना लॉकडाऊनमध्ये प्रवास पास देण्याची मागणी शिक्षण मंडळाने, पालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. मात्र गावी असलेल्या शिक्षकांकडे शिक्षण मंडळाने दिलेल्या लेखी आदेश व स्वतःचे शालेय ओळखपत्र असेलच असे नाही. त्यामुळे उत्तर पत्रिका कशा तपासून पूर्ण होणार असा प्रश्न आहे. तसेच कल्याण डोंबिवली बदलापूर तसेच वसई-विरार आधी दूर दूरच्या ठिकाणाहून सदर कामासाठी प्रवास करताना वाहतूक व्यवस्था नाही. तसेच जिल्हाबंदी, काही महापालिका आयुक्तांच्या बंदी अजित आदेशाबाबत अजूनही संभ्रम निर्माण झालेला आहे.
हेल्पलाइन सुरू करा
जिल्हा शिक्षणाधिकारी, तालुका शिक्षणाधिकारी यांनी मध्यस्थाची भूमिका पार पाडून प्रवास पास कुठे मिळेल, तसेच हेल्पलाईन नंबर सुरू करून शिक्षकांच्या सर्व अडचणी दूर करणे आवश्यक आहे. पास देताना उत्तरपत्रिका तपासण्याचे काम कोणाकडे आहे हे देखील जाहीर करणे गरजेचे आहे.


























































