
>> नीलांबरी जोशी
कोरोनाच्या समस्येवर सर्व जगभरातली माध्यमं 24×7 कानठळ्या बसवणाऱया आवाजात सांगत असताना पॅनिक होऊन खरेदी करण्याचं लोकांचं प्रमाण वाढत गेलं आहे. कोणत्याही गोष्टींचा अवाजवी साठा करणं ही काही लोकांची प्रवृत्ती असते. कोरोनाचा कहर असताना ही वृत्ती जास्त उफाळून आलेली दिसून येतेय.
कोरोना व्हायरसनिमित्तानं हिंदुस्थानात लॉकडाऊन जाहीर झालेला दिवस. हिंदुस्थानातल्या आयटी हब असलेल्या एका शहरातली दोन हजार अपार्टमेंटस असलेली एक टाऊनशिप. टाऊनशिपच्या आकारात दोन सुपरमार्केटस होती. त्या सुपरमार्केटमध्ये एकेका कुटुंबानं प्रत्येकी पोतीच्या पोती भरून खरेदी करायला सुरुवात केली. याचा परिणाम म्हणजे रांगेतल्या मागच्या माणसांना धान्य शिल्लक उरणं दुरापास्त होत गेलं. शेवटी दुकानदारानं प्रत्येकाला 1000 रुपयांचीच एकावेळी खरेदी करता येईल असा नियम केला. कोरोना वायरसची साथ पसरली आणि अनेक कुटुंबांनी घरात अन्नधान्याचा साठा करायला सुरुवात केली. असे अनेक प्रसंग घडताना आपण रोज पाहतो किंवा वाचतो आहोत. याचं प्रमाण वाढत गेल्यामुळे ‘आपल्याला कोरोना संपवायचा आहे, किराणा नाही’ असे जोक समाजमाध्यमांवर पसरायला लागले. अर्थात कोणत्याही गोष्टींचा अवाजवा साठा करणं ही काही लोकांची प्रवृत्तीच असते. एरिक फ्रॉम या मानसशास्रज्ञानं व्यक्तित्त्वाचं वर्गीकरण करताना अशा लोकांच्या व्यक्तिमत्त्वासाठी साठा करणारं व्यक्तिमत्त्व अशी संज्ञा वापरली आहे.
मुळात वस्तू बेसुमार जमवत राहणं हा साठा करून ठेवणाऱया व्यक्तिमत्त्वाच्या लोकांचा आवडता उद्योग असतो. वर्तमानपत्रं, मासिकं, प्लॅस्टिकच्या बॅग्ज, कार्डबोर्डची खोकी, जुने फोटो, घरातल्या वस्तू, साडय़ा, शर्टस किंवा कोणतेही कपडे, अन्नधान्य अशा कोणत्याही गोष्टींचा काजकीपेक्षा जास्त साठा करण्यात हे लोक पटाईत असतात. साठा करणाऱया क्यक्तींची लक्षणं म्हणजे, त्यांना आपल्या वस्तू सहजी देऊन टाकणं जमत नाही. वस्तू कोणाला द्यायची वेळआलीच तर हे लोक विलक्षण अस्वस्थ होतात, आपल्या साठवलेल्या वस्तूंचं वर्गीकरण करणं यांना जमत नाही. वस्तूंचं वर्गीकरण केलं तर घरातले लोक त्या वस्तू कोणालातरी देऊन टाकायला लाकतील अशी त्यांना भीती वाटते. या लोकांना कोणत्या वस्तू ठेवायच्या आणि कोणत्या टाकायच्या याचे निर्णय घेता येत नाहीत. आपल्या वस्तूंना इतर लोक हात लावतील याची त्यांना भीती वाटते. एखादी गरजेची वस्तू भविष्यात संपेल याची त्यांना कमालीची भीती असते उदा. तूरडाळ एकच कवर्षापुरती आहे.. ती संपली तर काय? किंवा आपल्याकडच्या पाच डिनरसेटमधले पाचही फुटले तर मग काय वगैरे..!
कोरोना काळात मात्र सगळ्यांनीच किराणा मालासारख्या अनेक वस्तू घरात प्रमाणाबाहेर विकत घेऊन ठेवल्या. त्यातही तीन प्रकार आहेत. एक म्हणजे, ज्यांना महिन्याला आपल्याला किती किराणा/भाजीपाला लागेल असा अंदाजच नसलेले लोक. एकटे रहाणारे, विद्यार्थी अशा लोकांना तो अंदाज नव्हता. त्यांनी अंदाज चुकून भरपूर वस्तू विकत घेऊन ठेवल्या. उदाहरणार्थ, वेफर्सची 100 पाकिटं वगैरे. दुसऱया प्रकारात मोडणारी माणसं म्हणजे, महिन्याला आपल्याला किती किराणा/भाजीपाला/इतर गोष्टी लागतात त्याचा पूर्ण अंदाज असणारी. ही माणसं नेहमी तर्कानं विचार करून लागेल तेवकढंच विकत घेतात. कोरोनाच्या काळात मात्र समाजाच्या रेटय़ानं त्यांच्याकरही ताण आला. त्यांनीही घाबरून जरा जास्तच वस्तू किकत घेतल्या.
तिसऱया प्रकारचे लोक साठा करण्याच्या व्यक्तिमत्त्वाचेच होते. त्यांनी तर वर्षभर पुरेल इतका अन>धान्याचा साठा करायला सुरुवात केली. याचा परिणाम म्हणजे, दुकानांमधल्या वस्तू संपत गेल्या. मग दुकानदारांना प्रत्येक माणसानं मर्यादित खरेदी करावी यासाठी खरेदीच्या किमतीवकर (एकावेळी 500 रुपयांच्याच वस्तू घ्या) किंवा वस्तूंच्या क्वांटिटीवर (एकाला चारच साबणाच्या वडय़ा कगैरे) निर्बंध घालावे लागले. हे आपण आज अनुभवतो आहोत.
कोरोनाच्या समस्येवर सर्व जगभरातली माध्यमं 24×7 कानठळ्या बसवणाऱया आवाजात सांगत असताना पॅनिक होऊन खरेदी करण्याचं लोकांचं प्रमाण काढत गेलं आहे असं ‘सायकॉलॉजी आा@फ पॅनडेमिक्स’ हे पुस्तक लिहिणारा स्टीव्हन टेलर हा मानसशास्त्रज्ञही सांगतो. साठा करण्याची ही प्रवृत्ती का काढत गेली त्यामागेही कारणं आहेत. महत्त्वाचं कारण म्हणजे, सतत काहीतरी विुकत घ्या असं सांगणाऱया जाहिराती/वेबसाईटस् आपल्यासमोर असतात. सौंदर्यप्रसाधनं, कपडे, गाडय़ा सगळं काही विशिष्ट वर्गातल्या लोकांना समोर ठेविुन डिझाईन केलेलं असतं. जाहिरातीही तशाच तयार केलेल्या असतात. एकटय़ा अमेझॉननं ऑनलाईन सेलसाठी जाहिराती करून 2018 साली 1000 कोटी डॉलर्सचा नफा कमवला होता. या जाहिरातींच्या भडिमारामुळे ‘काय विकत घ्यायचं’ हा विचार आपल्या मेंदूतली भरमसाट जागा व्यापून टाकतो.
यावर उपाय म्हणजे, गरज आणि हावरटपणा यातला फरक आपल्याला ओळखता यायला हवा. पुरेसं म्हणजे किती हे आपल्याला ओळखता आलं तर कदाचित आपण खर्च करत राहणं आणि वस्तूंवर ताबा मिळवणं या मनोवृत्तीतून बाहेर येऊ शकू. यासाठी आता घरात असतानाही एक गोष्ट सहज करता येईल. ती म्हणजे, आपण घरात किती कस्तू, कपडे गरज नसताना जमा केलेत याकर एक नजर टाका. मग तुम्हाला गेल्या दोन वर्षांत एकदाही न वापरलेल्या चपला, स्केटर्स, इलेक्ट्रॉनिक उपकरणं अशा अनेक वस्तू दिसायला लागतील. दुसरं म्हणजे आता किराणा/भाजीपाला सोडून ‘काय विकत घ्यायचं’ हा विचार मनात येत नसल्यामुळे मनाला त्या प्रांतात शांत वाटतंय का तेही आपलं आपण आजमावून पहा..!
रस्त्यारस्त्यावर अनवाणी पायांनी शेकडो मैल तुडकत जाणाऱया मजुरांचे तांडे आपण रोज पाहतो आहोत. त्यांना खायला अन> नसताना दुसरीकडे घरात गरज नसलेल्या हजारो गोष्टी साठवणारेही पाहतो आहोत. कोरोनाची समस्या भेडसावणारी आहे हे खरंच आहे, पण सोसायटीतली भाजी घेताना, किराणा आणताना त्यावर झडप घालणं, त्याकरून हमरीतुमवर येणं हे प्रकारही आपण पाहतो आहोतच.
याकरून टॉलस्टॉय या प्रसिद्ध लेखकाची एका शेतकऱयाची कथा आठवते. ‘ज्या जागेवरून सकाळी चालायला सुरुवात केली, तिथे सूर्यास्ताच्या वेळी पोचायचं. दिवसभरात जितकी पावलं तो शेतकरी चालेल ती सगळी जमीन त्याची’ अशी अट एका शेतकऱयाला घातली जाते. तो शेतकरी दिवसभर उर फुटेस्तोवर धावतो. संध्याकाळी तो त्यानं चालायला जिथून सुरुवात केलेली असते त्या जागी पोचतो. त्याला चिक्कार जमीन मिळू शकणार असते. पण दिवसभराच्या धावण्यानं तो मरण पावतो. शेकटी सहा फुटाच्या शवपेटीत त्याला पुरतात. माणसानं हव्यास धरू नये असं टॉलस्टॉयला या कथेतून सुचवायचं आहे. ‘एक कितीच्या भुकेस पुरते तळहाताची थाळी..’ या कथेतून ग. दि. माडगूळकर हे महाकवीही तेच सांगत आहेत. पण आपल्याला ते कधी समजणार?
(लेखिका मानसिक समुपदेशक आहेत)




























































