नवलच! सौर ‘दिवाळी’!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अरूण

सूर्य ‘दहा डोळय़ांनी’ आग ओकणारच असेल तर ती उढर्जा ‘पकडून’ आपली नैमित्तिक, रोजची उढर्जेची गरज का भागवू नये या विचारातून जगात अनेक ठिकाणी सौरउढर्जा निर्मिती करणारे ‘सोलारपार्क’ उभे राहिले आहेत. त्यातला सर्वात मोठा सुमारे 420 चौरस किलोमीटर व्यापणारा ‘सोलार पार्क’ चीनच्या क्विघाई भागात असून तब्बल 21000 मेगावॉट ऊर्जा निर्माण करतो.

दुसरा निन्गडॉन्ग सोलारपार्कही चीनमध्येच असून त्यातून 18,320 मेगावॉट वीज निर्मिती होत असते. जगात अनेक ठिकाणी प्रचंड सौर पॅनेल बसवलेले सोलार प्रकल्प आहेत, परंतु चीन हा जगात सर्वाधिक सौर उढजां वापरणारा देश आहे.
जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हणतात. तो सूर्याच्या ‘उगवण्याचा’ किती उपयोग करून घेतो, तर त्या देशात सूर्यकिरणांपासून 92 गिगावॉट ऊर्जा निर्मिती होते, परंतु चीनखालोखाल सौर ऊर्जेचा उपयोग करणारा देश आहे अमेरिका. चीनमधील सौर ऊर्जोत्पादन दरवर्षी 1202 गिगावॉट तर अमेरिकेत 211 गिगावॉट एवढं होतं. म्हणजे पहिल्या, दुसऱया क्रमांकातही बरीच तफावत दिसते. आपल्या देशात 13.5 गिगावॉट तर जर्मनीत 106 गिगावॉट सौर ऊर्जेची क्षमता आहे.
राजस्थामधील भाल्दा सोलारपार्कचा क्रमांक जागतिक सोलारपार्कमध्ये बराच वरचा आहे. तिथल्या जोधपूर जिल्हय़ात असलेल्या विस्तीर्ण अशा थरच्या वाळवंटात 57 चौरस किलोमीटर किंवा 14,000 एकरवर 2015 ते 2020 या काळात या सोलारपार्कची उभारणी झाली.

याशिवाय पावागड, कर्नूल इथेही सोलारपार्कच्या योजना कार्यान्वित असून त्यातून 10,000 मेगावॉट वीज प्राप्त होते. सौरउढर्जेचे महत्त्व जगाला पटलेलं असलं तर त्याच्या उभारणीचा आरंभीचा (इनिशिअल) खर्च आणि हवामानानुसार सौर उढर्जेतून पुरेसं उत्पादन यांचं गणित अणुऊर्जा, थर्मल किंवा हायडेल पावर यांच्या तुलनेत कमी आहे.

उद्याच्या जगात फोटेव्होल्टेक सेल किंवा अन्य प्रभावी माध्यमातून सौरऊर्जा अधिकाधिक ‘पकडता’ आली तर ती साठवून जगाला पुरेल एवढी क्षमता निर्माण व्हायला हवी.

एक खरी गंमत ः सूर्याची एका दिवसाची ऊर्जा जर पूर्णपणे साठवता आली तर ती 3.3ƒ1022 मेगावॉट-अवर्स एवढी म्हणजे पृथ्वीला (माणसांना) अनेक अब्ज वर्षे पुरेशी ठरेल! आता बोला!