स्वागत दिवाळी अंकांचे – साप्ताहिक चपराक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साप्ताहिक दिवाळी अंकाचा कथा विशेषांक कथा साहित्य प्रकार वाचणाऱया वाचकांना नक्कीच आवडेल असा आहे. मराठी साहित्यविश्वातील सर्वात लोकप्रिय साहित्य प्रकार म्हणजे कथा. वाचकाला वेगळ्या विश्वात नेण्याचं आणि अंतर्मुख व्हायला भाग पाडण्याचे सामर्थ्य असणाऱया या कथा दिवाळी अंकात महत्त्वाचे स्थान पटकावून असतात. हा दिवाळी अंक तर संपूर्णतः कथा या विषयाला वाहिलेला आहे. यामुळेच ही शिदोरी वाचकांना वर्षभर पुरणारी आहे. यात विषयांचे वैविध्य जपण्याचा प्रयत्न केल्याचेही दिसून येते. डॉ. किरण सोनार यांची ‘लाहेरीचा फतवा’ ही कथा नक्षलवादाचे दर्शन घडवते, नागेश शेवळकर यांची ‘सहवास अचानक थांबला तर’ ही कथा संवेदनशील विषयाला स्पर्श करते  तर प्रसिद्ध लेखिका अरुणा सबाने यांची ‘आभाळ सावली’ ही कथा स्त्राrशक्तीची जाणीव करून देते. याचप्रमाणे सु. ल. खुटवड, काशीनाथ माटल, डॉ. राजेंद्र माने, जनार्दन देबरे, गौरी भालचंद्र, कवी रमजान मुल्ला यांच्या कथा आवर्जून वाचाव्यात अशा आहेत. समाजातील सुखदुःखाची आपल्या कसदार लेखणीतून मांडणी करणारे हे कथालेखन दिवाळी अंकातील मानाचे पान ठरतात. म्हणूनच हा कथा विशेषांक वाचायलाच हवा.

संपादक ः घनश्याम पाटील

पृष्ठs ः 266, मूल्य ः 400 रुपये

सह्याद्री

‘सह्याद्री’ दिवाळी अंक यंदा कथा विशेषांक आहे. वैविध्यपूर्ण कथाबीज असलेल्या 12 कथा या अंकात आहेत. ज्येष्ठ लेखक, साहित्यिक प्रा. मिलिंद जोशी, यांची पहिलीच कथा रोजच्या जगण्यातील साधेपणा मांडणारी वाटते. तर गौरी गाडेकर यांची पांडव-कौरवांच्या युद्धप्रसंगाला मांडणारी कथा आपल्या तत्त्वज्ञानाचा अनेकांगी वेध घेते. अनुराधा बर्वे, व्यंकटेश कल्याणकर, उज्ज्वला केळकर, शुभदा कुलकर्णी, विजय तरवडे यांच्या कथा आवर्जून वाचाव्यात अशा आहेत. सोबत चारुशीला बलसरे, सुमेधा कुलकर्णी, शिल्पा चिटणीस यांच्या कवितांनी काव्यमैफल सजली आहे. केवळ कथा विषयाला संपूर्ण अंक वाहिला असल्याने कथानकं, कादंबरी वाचनाची आवड असणाऱया वाचकांना हा अंक नक्कीच आवडण्यासारखा आहे. हा अंक कथाविशेष असल्याने संग्रही ठेवण्यासारखा आहे.

संपादक ः डॉ. गीताली टिळक

पृष्ठs ः 45, मूल्य ः 20 रुपये

दीपावली

दीपावली दिवाळी अंकाचे हे 82 वे वर्ष. नेहमीप्रमाणेच यंदाचा दीपावली अंक वैचारिक साहित्य, लेख, कथा, कविता यांनी सजला आहे. मिलिंद बोकील, गणेश मतकरी, निखिलेश चित्रे, शर्मिला फउके, सुहास भास्कर जोशी या लोकप्रिय लेखकांच्या कथा, सुहास बहुलकर, अरुण खोपकर, डॉ. बाळ फोंडके, डॉ. प्रकाश खांडगे, मधुकर धर्मापुरीकर, डॉ. नंदू मुलमुले यांचे वाचनीय व दमदार लेख आहेत. या वर्षभरात पेपरफुटीची प्रकरणे बरीच गाजली. निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा, तरुणाईने केलेले आंदोलन, खरात प्रकरण आणि आता समोर दिसणारे दुष्काळाचे सावट हे ओझं घेऊन दिवाळीनंतरच्या पर्वात आपण प्रवेश करीत आहोत. या साऱयाचा गोषवारा मांडणारे लेख हे अंकाचे वैशिष्टय़ आहेत. डॉ. बाळ फोंडके यांचा जेन झी या पिढीवरचा अभ्यासपूर्ण लेख वाचनीय आहे. ‘भारतात वैज्ञानिक दृष्टीला ओहोटी लागली आहे का?’ अंजली चिपलकट्टी, अरविंद पाटील, गोपाळ आजगावकर, डॉ. आशुतोष दिवाण, चिन्मय केळकर, शाहू पाटोळे, डॉ. हृषीकेश रांगणेकर, सुबोध जावडेकर यांच्या लेखांनी हा विभाग वाचनीय ठरला आहे. सकस अभिरूची जपणारा आणि वाचनीय असा भरगच साहित्याने परिपूर्ण असलेला यंदाचा दीपावली अंक वाचकांची पसंती मिळवेल यात शंका नाही.

संपादक ः अशोक कोठावळे

पृष्ठs ः 300, मूल्य ः 400 रुपये    

वाटा भटकंतीच्या

भटकंती म्हणजे मनाला लागलेली वाटांची ओढ. वाटांची आणि भ्रमंतीची ही ओढ लेखांच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचवणारा हा दिवाळी अंक. फिरस्ती करणाऱयांसाठी अगदी मार्गदर्शक ठरावा असा हा दिवाळी अंक आहे. या अंकात तोरणा किल्ल्याचे शब्दचित्र रेखाटणारा नीती मेहेंदळे यांचा लेख, नर्मदा परिक्रमेचा अंतर्मुख करणारा प्रवास उलगडणारा मिलिंद आमडेकर यांचा नर्मदेकाठची निरीक्षणे, पक्ष्यांच्या दुनियेत रमणाऱयांनी आवर्जून वाचावा असा पक्षीजत्रा मांडणारा लेख वाचायलाच हवेत. पर्यावरण हा महत्त्वाचा मुद्दा मांडत काही विशेष लेख या अंकात आहेत. पर्यावरण तज्ञ संदीप श्रोत्री, वंदना कुलकर्णी, रवींद्र माहिमकर, मकरंद जोशी, मानसी आमडेकर यांचे लेख आवर्जून वाचावेत असे आहेत. भटकंतीच्या नव्या, जुन्या वाटांचा वेध घेणारा हा अंक पर्यटन, पर्यावरण, निसर्ग आणि फिरस्तीची ओढ हे सारं मांडणारा आहे.

संपादक ः मिलिंद आमडेकर

पृष्ठs ः 162, मूल्य ः 250 रुपये