संगमेश्वरध्ये चार कोरोनाग्रस्त आढळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संगमेश्वर येथील 4 जणांचे अहवाल प्राप्त झाले. हे 4 अहवाल पॉ‍झिटिव्ह आले आहे. या सर्वांचे स्वॉब नमुने 9 मे 2020 रोजी घेण्यात आले होते. या चौघांचाही मुंबई प्रवासाचा इतिहास आहे.

यातील दोन जण चेंबुर येथून आले असून एक जण कांदिवली येथून तर एक जण पनवेल येथून आलेला आहे. या सर्वांना क्वांरटाईन करुन ठेवण्यात आलेले होते. यामुळे आता जिल्हयातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 38 झाली आहे.