मुंबईहून वसमत तालुक्यात परतलेले 8 जण कोरोना पॉझिटिव्ह, हिंगोलीची रुग्ण संख्या 15 वर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई येथून वसमत तालुक्यात गावी परतलेल्या आठ जणांना कोरोनाची लागण झाली असून आज 17 मे रोजी तपासणी अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या पंधरा झाली आहे.

हिंगोली जिल्ह्यात यापूर्वी 91 जनांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी काल 16 मेपर्यंत 84 रुग्ण बरे झाल्याने रुग्णालयातून त्यांना सुट्टी देण्यात आली. जिल्ह्याची रुग्णसंख्या 7 वर आलेली असताना आज रविवारी सकाळी वसमत तालुक्यातील आठ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आरोग्य यंत्रणेला प्राप्त झाला आहे. मुंबई येथून आल्यावर या आठ जणांना वसमतच्या शासकीय विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले होते.