बीड जिल्ह्याची चिंता वाढली, कोरोनाचे 7 रुग्ण आढळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना मुक्त असलेल्या बीड मध्ये शनिवारी  दोन जण पॉझिटिव्ह आढळल्या नंतर रविवारी यात सात जणांची भर पडली. कोरोना ग्रस्तांचा आकडा आता 9 वर पोहोचल्याने बीड जिल्ह्याची चिंता वाढली आहे.

बीड जिल्ह्यात शनिवारी दोन रुग्ण आढळल्यानंतर रविवारी आणखी 7  रुग्ण पॉझिटिव्ह म्हणून समोर आले आहे  रविवारी 7 जण  पॉजिटिव्ह आहेत. या रुग्णांमध्ये 6 वर्षांच्या बालकासह 66 वृद्ध व्यक्तींचा समावेश आहे. हे सर्व 13 मे रोजी मुंबईहून निघाले होते. 14 तारखेला आष्टी तालुक्यातील सांगवी पठाण येथे नातेवाईकांकडे आले होते. हे सर्व नगर जिल्ह्यातील पिंपळगाव येथील रहिवासी आहेत. आता जिल्ह्यात एकूण पॉजिटिव्ह रुग्णांची संख्या 9 झाली आहे.