मनरेगासाठी केंद्र सरकारकडून 40 हजार कोटींचा निधी, राहुल गांधींनी मानले आभार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात मनरेगा योजनेअंतर्गत रोजगार वाढवण्यासाठी केंद्र सरकारने रविवारी 40 हजार कोटींच्या निधीची घोषणा केली आहे. यासाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटींच्ची आत्मनिर्भर योजना जाहीर केली होती. मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने मनरेगा या योजनेसाठी 40 हजार कोटींची अधिक तरतूद केली आहे. या योजनेचे वार्षिक बजेट 61 हजार कोटी असते. केंद्रीय ग्रामी विकास मंत्रालयाने अजून आर्थिक तरतूद करून एकूण बजेट हे 1 लाख ९५ हजार कोटींवर गेले आहे.

केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद सिंह तोमर म्हणाले की मोदी सरकार ग्रामीण भाग, गरीब जनता आणि शेतकर्यांcची काळजी घेत आहेत. मजुरांच्या भल्यासाठी मनरेगा बजेटमध्ये 66 टक्क्यांहून अधिक तरतूद केल्याप्रकरणी तोमर यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करून पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहे. गांधी यांनी म्हटले की मनरेगा ही योजना दूरदर्शी असून त्याला प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांचे आभार