
मंगळवार अखेर एकूण 17 रेल्वेमधून 22 हजार 788 मजूर कोल्हापूर जिल्ह्यामधून मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडकडे रवाना झाले आहेत.
मंगळवार दुपारी 1 वाजता जिल्ह्यातील 1 हजार 456 मजुरांना घेऊन बिहारमधील मोतिहारीकडे श्रमिक रेल्वे रवाना झाली. तर सायंकाळी पाच वाजता 1 हजार 460 मजुरांना घेऊन झारखंडमधील बोकारोकडे रेल्वे रवाना झाली. आजअखेर जिल्ह्यातील एकूण 22 हजार 788 रवाना झालेल्या मजुरांपैकी सर्वाधिक 13 हजार 552 उत्तरप्रदेशकडे रवाना झाले आहेत. तर बिहारकडे 5 हजार 688, मध्य प्रदेशकडे 1 हजार 66, झारखंडकडे 1 हजार 460 आणि राजस्थानकडे 1 हजार 477 मजूर परतले आहेत.



























































