
उत्तर प्रदेशमध्ये 22 टक्के प्रवासी मजुरांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाचे मुख्य सचिव अमित मोहन प्रसाद यांनी ही माहिती दिली आहे. उत्तर प्रदेशमध्ये चार लाखहून अधिक प्रवासी मजुरांना घरीच क्वारंटाईन करण्यात आले आहे. आशा कर्मचार्यांकडून या मजुरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या मजुरांपैकी 565 मजुरांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्याचे मोहन यांनी सांगितले.
टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. अमित मोहन प्रसाद म्ह्णाले प्रवासी मजुरांच्या एकूण 117 कोरोना अहवाल प्राप्त झाले असून 26 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 91 जण हे निगेटिव्ह आहेत. 22.2 टक्के मजुरांना कोरोनाची लागण झाल्याचे त्यांनी सांगितले. मजुरांनी क्वारंटाईनचे नियम पाळावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.
https://youtu.be/u6O_UpiNWNs
प्रवासी मजुरांमध्ये कोरोनाचे प्रमाण अधिक आहे. एका अधिकार्यांना नाव न सांगणाच्या अटीवर माहिती दिली आहे की राज्यातील एकूण कोरोना रुग्णांपैकी 70 टक्के हे प्रवासी मजूर आहेत. 1 ते 18 मे दरम्यान कोरोना रुग्णांची संख्या 2296 इतकी झाली आहे. यापैकी 1600 रुग्ण हे मजूर प्रवासी असू शकतात असा अंदाज या अधिकार्याने व्यक्त केला आहे.
1 ते 18 मे दरम्यान उत्तर प्रदेशमधील विविध लॅब्समध्ये 94 हजार कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. 1600 टेस्ट या प्रवासी मजुरांच्या असून 1.7 टक्के कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. त्यामुळे प्रवासी मजुरांच्या कोरोना पॉझिट्व्ह रुग्णांचे प्रमाभ 1.7 टक्के असू शकतात. एक टक्का हा आकडा जरी कमी वाटत असला तरी रुग्णांची संख्या ही 14 हजार च्या घरात जाण्याची शक्यता आहे.
प्रवासी मजुरांची प्रत्येक टप्प्यावर तपासणी केली जाते अशी माहिती सचिव प्रसाद यांनी दिली आहे. आधी त्यांची थर्मल टेस्ट केली जाते. त्यात जर ते निगेटिव्ह असले तर त्यांना 21 दिवसांसाठी घरीच क्वारंटाईन केले जाते. सात दिवसांनंतर त्यांची पुन्हा टेस्ट केली जाते. थर्म टेस्टमध्ये जर ते निगेटिव्ह आढळले तर त्यांना रुग्णालयात भरती केले जाते असेही प्रसाद म्हणाले.
उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत 4 हजार 926 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. 2 हजार 918 रुग्ण बरे झाले असून 123 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

























































