
फेसबुक अकाऊंट हॅक करुन त्याद्वारे मुलगा आयसीयुमध्ये आहे ताबडतोब पैसे पाठवा असा मेसेज पाठवून एका बीएसएफ जवानाची सुमारे ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी अज्ञात मोबाईल धारकाविरोधात चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विरंद्रसिंग नपेसिंग या चाकूर येथील बीएसएफमध्ये कार्यरत जवानास त्याच्या भावाच्या मेव्हण्याच्या फेसबुक अकाऊंट वरुन मेसेज आला. माझा मुलगा आयसीयुमध्ये आहे ताबडतोब पैसे पाठवा. त्यांनी अकाऊंट नंबर मागवून घेतला आणि त्या खात्यामध्ये तब्बल 40 हजार रुपये स्वतःकडील आणि इतर मित्रांकडून घेऊन पाठवले. जेंव्हा फिर्यादीने फोन करुन त्यांना विचारणा केला असता त्यांनी सांगीतले की, मागील 4 दिवसांपासून त्यांचे फेसबुक अकाऊंट हॅक केले आहे. त्यामुळे ते वापरतच नाही. त्यावरून अज्ञात व्यक्तीने फसवणूक केली म्हणून दिलेल्या तक्रारीवरुन चाकूर पोलीसांनी अज्ञात व्यक्ती विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.


























































