
गेवराई येथील ताकडगाव रस्त्यावर असलेल्या रूची भोजनालयामध्ये सोमवारी रात्री जमिनीचा सातबारा देण्यासाठी शेतकऱ्याकडे लाचेची मागणी करणाऱ्या तलाठ्याला रंगहात पकडण्यात आले आहे. जमिनीचा सातबारा आणि आठ अ चा उतारा देण्यासाठी तलाठी दादासाहेब सुखदेव आंधळे (वय 34) असे या तलाठ्याचे नाव आहे. तो खळेगाव येथील सज्जाचा तलाठी आहे.
आंधळे यांनी तक्रारदाराकडे जमिनीचा सातबारा आणि आठ अ चा उतारा यासाठी लाच मागितली होती. लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तलाठी दादासाहेब रंगेहात पकडले. याप्रकरणी तक्रारदार कैलास नारायणराव ढोले यांच्या फिर्यादीवरून गेवराई पोलिस ठाण्यात मंगळवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



























































