
बहिणीसोबत मामाच्या एक वर्षांच्या मुलीला दुचाकीवर बसवनू घरी सोडण्यासाठी जात असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या टँकरचालकाने दुचाकीला धडक दिली. त्यामुळे झालेल्या अपघातात चिमुरडीसह दोन मुली ठार झाल्या. हा अपघात दोन दिवसांपुर्वी रात्री साडेनउच्या सुमारास रेसीडेन्सी क्लबसमोरील आयबी बंगला चौकात घडली. घटनेनंतर टँकरचालक फरार झाला आहे.
रहेनाज रिझवान शेख (वय 16 रा. विमाननगर), आणि उम्मेहनी सुहेल शेख (वय 1 वर्षे, रा. कॅम्प पुणे ) असे ठार झालेल्या मुलींची नावे आहेत. याप्रकरणी रूकसार रिझवान शेख (वय 24, रा. विमाननगर) यांनी कोरेगाव पार्वâ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहेनाजने दहावीची परिक्षा दिली होती. दोन दिवसांपुर्वी रात्री नउच्या सुमारास रुकसार आणि रहेजान या बहिणी मामाची मुलगी उम्मेहनीला कॅम्पमध्ये घरी सोडविण्यासाठी दुचाकीवरुन जात होत्या. त्यावेळी आयबी चौकात पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या टँकरचालकाने रुकसारच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे रहेजान आणि उम्मेहनी खाली पडल्याने गंभीररित्या जखमी झाल्या. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रूकसार आणि एक वर्षांची चिमुरडी उम्मेहनीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक भागवत शेंडगे तपास करीत आहेत.






















































