आभाळमाया – अंतराळातील ऐतिहासिक क्षण!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वैश्विक

एलॉन मस्क हे महत्त्वाकांक्षी उद्योगपती (टेस्ला कार बनवणारे) अंतराळाकडे कधीपासून नजर लावून आहेत. त्यांना चंद्रावरच काय पण थेट मंगळावर ‘पर्यटक’ पाठवण्याची स्वप्नं पडतायत. अर्थात त्यासाठी त्यांचे प्रयत्न जोमाने सुरू आहेत. या धनाढ्य उद्योजकांच्या सहाय्याची गरज ‘नासा’सारख्या अमेरिकन सरकारी संस्थेलाही लागते. सहकार्य म्हणा हवं तर पण नासा (किंवा नॅसा) त्यांची मदत घेऊन यापुढची वाट अंतराळी वाटचाल करणार असं दिसतंय. त्यातलं पहिलं महत्त्वाचं ‘मिशन’ 30 मे रोजी (आपल्याकडच्या 31 मे) यशस्वी झालं.

‘स्पेस एक्स’च्या ड्रॅगन क्रू -डेमो-2 या रॉकेटवरचं यान सहा तासांत केनेडी स्पेस स्टेशनवरून अवकाशात झेपावलं आणि रॉबर्ट बेनकेन व डग्लस हर्ली असे दोन अंतराळवीर अंतराळस्थानकावर सुखरूप दाखल झाले! अर्थात या अंतराळस्थानकावर पृथ्वीवरून अंतराळयात्री पाठवण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. आपली सुनीता विल्यम्ससुद्धा तिथे बराच काळ राहून आलेली आहे. मग डेमो-2चं वैशिष्ट्य काय? तर एखाद्या खासगी संस्थेच्या अंतराळयात्रींचा स्पेस स्टेशनवरचा पहिला प्रवेश आणि 2011 नंतर तब्बल 9 वर्षांनी अमेरिकेतून कोणी अंतराळयात्री तिथे जाणं घडलंय. या निमित्ताने अंतराळयात्रेचा ‘व्यावसायिक’ मार्गही दिसू लागला आहे.

ज्या आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर हे दोन अंतराळयात्री नुकतेच पोचले ते पृथ्वीभोवती दर 90 मिनिटाला एक फेरी मारत. 1998 पासून रशिया व अमेरिकेचा संयुक्त उपक्रम असलेल्या या स्थानकाने कितीतरी पृथ्वीप्रदक्षिणा घातल्या आहेत. पृथ्वीपासून अवकाशात ते खूप दूर नसल्याने जेव्हा हिंदुस्थानी भूभागावरून जातं तेव्हा संध्याकाळच्या किंवा पहाटेच्या आकाशात, नुसत्या डोळ्यांनाही स्पष्टपणे दिसतं. सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर काही वेळ ज्यावेळी सूर्यप्रकाश अजूनही स्पेस स्टेशनवर पडत असतो तेव्हा होणारं त्याचं ‘दर्शन’ आम्हीही अनेकदा घेतलं आहे. अर्थात हे सगळं शक्य होतं ते प्रकाश प्रदूषण नसलेल्या ठिकाणावरून.

या ‘स्पेस स्टेशन’वर आतापर्यंत 19 देशांचे 240 अंतराळयात्री विविध अवकाशी प्रयोगांसाठी जाऊन आलेत. त्यांच्यापैकी पिगी विट्सन या महिला अंतराळयात्रीने 2017 मध्ये तिथे तब्बल 665 दिवस म्हणजे सुमारे दोन वर्षे राहण्याचा विक्रम केलाय. स्पेस स्टेशनवर राहण्याची व्यवस्था उत्तमच आहे. चांगला सहा बेडरूमचा मोठा फ्लॅटच तिथे असून त्यामध्ये सर्व सोयीसुविधा आहेत. समस्या एकच ती म्हणजे तिथे गुरुत्वाकर्षण शून्यवत असल्याने माणसांसह सर्व वस्तू आपोआप तरंगतात. पाण्याच थेंब उडाला विंâवा टूथब्रश हातातून निसटला की लागला अवतीभवती तरंगायला! या सर्व गोष्टी पकडून आणि जखडून काम करण्याचं प्रशिक्षण अर्थातच सर्वच अंतराळयात्रींना दिलं जातं. तरीही काही गंमती घडतातच. मात्र हा एवूâण अंतराळी प्रवास आणि निवास म्हणजे ‘गंमत’ नव्हे.

विलक्षण गुंतागुंतीची रचना असलेल्या या स्पेस स्टेशनची लांबी ३५७ पूâट (एका मोठ्या एअरबसएवढी) आहे. एवूâण १२ किलोमीटर होईल इतक्या वायरींचं जाळं संदेश, ऊर्जावहन करत असतं. त्यामध्ये ५० संगणक असून अनेक वॅâनॅडआर्य म्हणजे रोबोटिक हात आहेत. वैज्ञानिक भाषेत त्याना ‘शटल रिमोट मॅनिप्युलेटिंग सिस्टम’ असं म्हटलं जातं. या ‘आर्म’च्या सहाय्याने अंतराळयात्री ‘स्पेस स्टेशन’च्या देखभालीचं आणि प्रसंगी दुरुस्तीचंही काम करतात. सर्वात महत्त्वाचं कार्य असतं ते स्पेस स्टेशनवर विज्ञानाच्या अनेक शाखांशी निगडित प्रयोग करणं. तसे प्रयोग करून आपल्याला ‘उद्याच्या’ अंतराळ मोहिमांसाठी मार्गदर्शन मिळतं.

आपल्याकडून रॉकेट अंतराळात सोडताना त्याचा वेग साधारणत: ताशी २८ हजार किलोमीटर एवढा असतो. डेमा-२ चे अंतराळवीर नेणाNया ‘फाल्कन’ रॉकेटचा वेग २७ हजार कि.मी. होता. या वेगाने सुमारे ६ तासांत अंतराळ स्थानाकावर पोचता येतं. ते जवळ आलं की यानाचा वेग त्याच्याशी तंतोतंत जूळवून घेऊन ‘हॉविंâग’ करावं लागतं. सगळा ‘पराक्रम’ करून ड्रॅगन -डेमो’ पृथ्वीवर सुखरूप परतलंय! याचं गणित पक्वंâ असतं. आजवरच्या २४० ‘हॉविंâग’मध्ये कधीच गफलत झालेली नाही. एवढंच नव्हे तर अंतराळस्थानकात यशस्वी प्रवेश केलेले अनेक अंतराळवीर तिथे रुळल्यावर ‘स्पेस वॉक’साठी बाहेर पडतात. ते सुद्धा प्रयोग म्हणून विंâवा ‘मेन्टेनन्स’साठी असतं. आजपर्यंत अशी २२१ ‘स्पेस वॉक’ अंतराळयात्रींनी केली आहेत. ‘स्पेस एक्स’ वंâपनीचे अंतराळयात्री काय नवे प्रयोग तिथे करणार ते लवकरच समजेल. पण त्या निमित्ताने अंतराळ प्रवासाचा नवा अध्याय सुरू झालाय हे खरं!