
चिकलठाणा येथील कैलास बकाल पाटील यांच्या मुलाचा खोकडपुरा येथील संतोष वेताळ यांची मुलगी साक्षी हिच्या सोबत आज राहत्या घरी साधेपणाने संपन्न झाला.
दोन्ही कुटुंबातील फक्त पाच – पाच नातेवाईक ह्या विवाहास उपस्थित होते. लग्नात होणारा खर्च वाचल्यामुळे वधूपित्याने 51000 रुपये मुखमंत्री निधी मध्ये जमा करण्याचा निर्णय घेतला. खोकडपुराचे शिवसेनेचे माजी नगरसेवक सतीश कटकटें व जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्याकडे त्यांनी सदर निधीचा धनादेश सुपूर्द केला.


























































