पाऊस आला रे…! मॉन्सून कोकणात दाखल, दोन तास ‘धुवाँधार’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ढगांचा गडगडाट करत मॉन्सून कोकणात दाखल झाला आहे. आज गुरूवारी दुपारनंतर कोकणात ढगाळ वातावरणाने मॉन्सूनच्या आगमनाची वर्दी दिली त्यानंतर पावसाने हजेरी लावली. सतत दीड ते दोन तास पाऊस पडत होता.

यापूर्वी ३१ मे रोजी जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला होता. निसर्ग चक्रीवादळाबरोबरच जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला होता. चक्रीवादळानंतर मॉन्सूनचे आगमन लांबले होते. आज दुपारी मान्सून रत्नागिरी जिल्ह्यात मॉन्सून दाखल झाला. मॉन्सून दाखल झाल्यामुळे शेतीच्या कामाना वेग येणार आहे तसेच गावागावातील पाणीटंचाई संपुष्टात येणार आहे.

मॉन्सून थोडा विलंबाने दाखल झाला असला तरी अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात गेल्या दहा दिवसात २४८ मिमी पाऊस पडला आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या दिवशी जिल्ह्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली होती. त्यामुळेच दापोली तालुक्यात दहा दिवसात ३३६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. संगमेश्वर ३१० मिमी, लांजा ३०३ मिमी, मंडणगड २७५ मिमी, चिपळूण २१९ मिमी, गुहागर २४१ मिमी, रत्नागिरी १४१ मिमी, खेड १६५ मिमी, राजापूर २३४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.