दहावी, बारावीच्या निकालाची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही, राज्य शिक्षण मंडळाचे स्पष्टीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
exam_prep
प्रातिनिधिक फोटो

दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या निकालाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नसल्याचे राज्य शिक्षण मंडळाने स्पष्ट केले. सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या तारखांवर विद्यार्थी आणि पालकांनी विश्वास ठेवू नये असे आवाहन देखील मंडळाने केले आहे.

फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये झालेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यासाठी खोटी वेबसाईट सोशल मीडियावर व्हायरल होत होती. त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. ही खोटी वेबसाईट प्रसारित करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी अशी मागणी युवा सेनेचे मुंबई विद्यापीठातील व्यवस्थापन परिषद सदस्य प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शकुंतला काळे यांच्याकडे केली होती. युवासेनेच्या तक्रारीची दखल घेत शिक्षण मंडळाने तातडीने एक प्रसिद्धीपत्रक जाहीर करून वरील स्पष्टीकरण दिले. शिक्षण मंडळाने प्रसिद्धीपत्रक जाहीर केले असले तरी सायबर क्राईम पोलिसांनी गुन्हा नोंदवून, दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत आमचा पाठपुरावा सुरूच राहील असा इशारा युवासेनेने दिला आहे.