जालना जिल्ह्यातील आव्हाना रोहित्र जळाल्यामुळे गाव अंधारात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील आव्हाना येथील रोहित्र जळाल्याने अर्धे गाव अंधारात असून यामुळे आव्हानेकरांना संकटाचा सामना करावा लागत आहे. आव्हाना येथे 10 ते 15 दिवसात रोहित सिंगल फेज जळण्याची घटना वारंवार घडत आहे. गावांमध्ये सध्या सिंगल फेज रोहित्रची संख्या बारा असून त्यापैकी 5 रोहित निकामी झाले आहेत. त्यामुळे आठ ते नऊ हजार लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये जवळपास अर्धे गाव अंधारात आहे. गावात रोहित्र जळण्याच्या घटना वारंवार घडत असल्यामुळे यासाठी काही ठोस उपाय करण्याची मागणी जोर धरत आहे. गावातील लोकसंख्येनुसार व गावाच्या विस्तारानुसार वीजवीटपाचे नियोजन होणे महत्वाचे आहे.