सिंधुदुर्ग जिल्ह्यात समाधानाकरक पाऊस, संभाव्य पाणीटंचाई संपुष्टात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 1 जून पासून पावसाला सुरुवात झाल्याने जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाई संपुष्टात आली आहे. जिल्ह्यात पाणी टंचाई च्या मंजूर 420 कामांपैकी 261 कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले असून 130 कामे पूर्ण झाली आहेत. तर अद्यापही 131 कामे अपूर्ण असून ही कामे पूर्ण करण्यासाठी 30 जून पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या वतीने यावर्षी 11 गावे 641 वाड्यांचा समावेश असलेला 6 कोटी 93 लाख 6 हजार रुपयांचा पाणी टंचाई आराखडा तयार करण्यात आला होता. या आराखडयांतर्गत 425 कामांची अंदाजपत्रके मान्यतेसाठी जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्याकडे सादर करण्यात आले होती. त्यापैकी 420 कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली होती. त्यामध्ये विंधन विहीर 123, विंधन विहीर दुरुस्ती 49, विहीर खोल करणे व गाळ काढणे 133, नळ पाणी पुरवठा दुरुस्ती 102 तर तात्पुरती नळ पाणी पुरवठा योजना 13 कामांचा समावेश आहे.

1 जून पासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाल्याने जिल्ह्यातील पाणी टंचाई चा प्रश्न तुर्तास संपला आहे. परंतु 131 कामे अद्यापही अपूर्ण आहेत.

बॉक्स… कोरोनाच्या संकटात पाणी टंचाई संकट धूसर

जिल्ह्यात पाणी टंचाई च्या काळात यावर्षी कोरोना महामारीचा फैलाव वाढला. मात्र या कालावधीत जिल्ह्यात कोठेही तीव्र पाणी टंचाई जानवल्याच चित्र पाहायला मिळाले नाही. तसेच कोठेही टँकर पुरवावा लागला नाही. पाण्यासाठी आंदोलनेही झाली नाहीत. त्यामुळे कोरोनाच्या संकटात पाणी टंचाईचे संकट धूसर झाल्याचे दिसून आले.