मुंबईत 941 नवे कोरोना रुग्ण, 55 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत गेल्या काही दिवसांत सुमारे दीड हजाराने होणारी कोरोना रुग्णांची वाढ आज काहीशी कमी झाली असून गेल्या एकाच दिवसांत 941 रुग्ण नोंदवले गेले आहेत. तर 55 जणांचा मृत्यू झाला आहे. शिवाय एकाच दिवसांत 915 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने एकूण कोरोनामुक्त होणार्‍यांची संख्या 31 हजार 40 वर पोहोचली आहे.

मृत झालेल्या 55 जणांमध्ये 43 पुरुष आणि 12 महिलांचा समावेश आहे. मृतांमधील 29 जणांचे वय 60 वर्षांहून जास्त, 24 रुग्णांचे वय 40 ते 60 वर्षांदरम्यान आणि 2 रुग्णांचे वय 40 वर्षांपेक्षा कमी होते. शिवाय मृतांमधील 34 जणांना काही दीर्घकालीन आजार होते अशी माहिती पालिकेच्या आरोग्य खात्याकडून देण्यात आली. मुंबईतील मृतांची संख्या प्रलंबित रिपोर्टसह आता 3165 इतकी झाली आहे. दरम्यान, मुंबईत सध्या 25 हजार 937 अ‍ॅक्टिव्ह केसेस असल्याची माहितीही पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.