
कोरोनाबाधित असल्याचा रिपोर्ट मिळाल्यानंतर निर्माण होणारी भिती आणि गोंधळ टाळण्यासाठी पॉझिटिव्ह रिपोर्ट थेट लॅबकडून देण्यास बंदी घालण्यात आली आहे. यानुसार संबंधित रुग्णाला पॉझिटिव्ह रिपोर्ट आता पालिकेकडूनच दिला जाणार असून बेडच्या व्यवस्थेपर्यंत पोहचवणे आणि आकश्यक मार्गदर्शन करण्याचे कामही केले जाणार आहे. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी याबाबत परिपत्रक जारी केले आहे.
कोरोना चाचण्या करण्यासाठी पालिकेच्या चार, राज्य सरकारच्या चार आणि इतर खासगी मिळून 25 आणि त्यांच्या अनेक शाखांच्या माध्यमातून चाचण्या केल्या जात आहेत. पॉझिटिव्ह रिपोर्ट असल्यास पालिकेच्या माध्यमातूनच रुग्णाला कळवण्यात येणार आहे. मात्र रिपोर्ट निगेटिव्ह असला तर लॅबला रुग्णाला थेट सांगण्याची परवानगी देण्यात आली आहे.
अशी होणार कार्यकाही
रुग्णांच्या तक्रारी, समस्या आणि सुकिधेसाठी पालिकेच्या नागरी तक्रारींसाठी असणाऱया ‘1916’सह सर्व 24 वॉर्डमध्ये पालिकेच्या माध्यमातून ‘वॉर रूम’ सुरू करण्यात आले आहेत. याठिकाणी तज्ञ डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱयांची टीम 24 तास कार्यरत आहेत. यानुसार ज्या भागातील रुग्ण असेल त्याला संबंधित विभागात उपलब्ध असणाऱ्या कोरोना हेल्थ सेंटरची माहिती दिली जाईल.
संपर्काची व्यवस्था
– ए विभाग – 2270 0007, बी विभाग – 2375 9023, सी विभाग – 2219 7331, डी विभाग – 23835004, ई विभाग – 2300 0150, एफ/दक्षिण विभाग – 2417 7507, एफ/उत्तर विभाग – 24011380, जी/दक्षिण विभाग – 2421 9515, जी/उत्तर विभाग 2421 0441.
– एच/पूर्व विभाग – 2663 5400, एच/पश्चिम विभाग – 2644 0121, के/पूर्व विभाग – 2684 7000, के/पश्चिम विभाग – 2620 8388, पी/दक्षिण विभाग – 2878 0008, पी/उत्तर विभाग – 2844 0001, आर/दक्षिण विभाग – 2805 4788, आर/उत्तर विभाग – 2894 7350, आर/मध्य विभाग – 2894 7360.
– एल विभाग – 2650 9901, एम/पूर्व विभाग 2552 6301, एम/पश्चिम विभाग 2528 4000, एन विभाग 2101 0201, एस विभाग 2595 4000, टी विभाग 2569 4000



























































