
देशात सहकारी बँकांचे जाळे मोठे असून त्यांना सायबर हल्ल्याचा धोका निर्माण झाला आहे. ऍडविंड जावा रॅटच्या (आरएटी) माध्यमातून बँकांची सिस्टम हॅक करून आर्थिक गंडा घातला जाऊ शकतो, असे सेक्राईट या सायबर सुरक्षा क्षेत्रातील संस्थेने स्पष्ट केले आहे. तसेच सायबर हल्ल्याचा प्रयत्न ओळखण्याबरोबरच तो टाळण्यासाठी सेक्राईटने विकसित केलेले सिग्नेचरलेस आणि सिग्नेचर आधारित डिटेक्शन तंत्राचा वापर करावा असे आवाहन सेक्राईट केले आहे.
देशातील सर्वच सहकारी बँकांमध्ये संगणकीकृत प्रणाली आहे. त्यामुळे सायबर हल्लेखोर ऍडविंड जावा रॅटच्या माध्यमातून बँकिंग प्रणाली वापरकर्त्याच्या डिव्हाईसचा ताबा घेऊन त्याची संवेदनशील माहिती चोरू शकतात. तसेच ग्राहकांची माहिती चोरून नियोजित सायबर हल्ला करून शकतो. त्याचबरोबर कर्मचारी किंवा वापरकर्त्याच्या लॉगीनची माहिती चोरून आर्थिक फेरफार करू शकतात. त्यामुळे अशाप्रकारच्या सायबर हल्ल्याना ओळखणे किंवा रोखणे, अनोळखी अटॅचमेंट, वेबलिंक ओपन न करण्याचा सल्ला सेक्राईट वापरकर्त्याना देते. तसेच बँकांनी सर्क ऑपरेटिंग सिस्टम अपडेट ठेवाव्यात, सेक्युरीटी सोल्युशन वापरावे असे स्पष्ट केले आहे.
असा होतो सायबर हल्ला
ऍडकिंड जावा रॅट हे स्पिर फिशिंग ई मेलपासून सुरू होते. सदर ई मेल आरबीआय किंवा राष्ट्रीयकृत बँकांमधून आल्याचा दावा मेल पाठवणारा करतो. त्यामध्ये कोविड-19 बाबत मार्गदर्शक सूचना किंवा जार आधारित मालवेअर झिप फाईलच्या अटॅचमेन्टमध्ये आर्थिक व्यवहाराची माहिती असते. हे सेक्राईटच्या तज्ञांनी केलेल्या संशोधनातून समोर आले आहे. जार हे रिमोट ऍसिक्स ट्रोजन असून ते जावा रनटाईम असलेल्या कोणत्याही संगणकावर चालते. त्यामुळे हल्लेखोर ऑपरेटिंग सिस्टममध्ये घुसून डिव्हाईसचा ताबा घेऊन सर्व प्रकारच्या माहितीची चोरी करून आर्थिक नुकसान करू शकतो.
























































