
जगातील सर्वात मोठी बाजारपेठ असणाऱ्या हिंदुस्थानमध्ये कोटयवधी लोकांकडे स्मार्टफोन आहेत. मात्र या फोनमधील काही ऍप तुमची खासगी माहिती चोरी करू शकतात आणि त्याचा गैरवापर करू शकतात असा इशारा सुरक्षा एजन्सीने दिला आहे. टिकटॉक (TikTok), व्हीचॅट (Wechat), शेअरइट (Shareit), यूसी ब्राउजर (UC Browser), ब्यूटी प्लस (Beauty Plus) सह 50 चायनीज ऍप तुमच्या आणि देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यासह महिलांसाठी खरेदीसाठी टॉपला असणाऱ्या शेन (Shien) आणि क्लब फॅक्टरी (Club Factory) ही ऍप देखील धोकादायक यादीत ठेवण्यात आली आहेत.
सुरक्षा एजन्सीच्या अहवालानुसार, चायनीज ऍपच्या सहाय्याने युजरचा आणि देशाचा महत्वाचा डेटा चोरी करून देशाबाहेर पाठवला जात आहे. फोनमधील ऍप खासगी माहिती स्टोअर करून ठेवतात आणि ही माहिती कंपनीकडे पाठवली जाते. नियमानुसार चिनी कंपनी तो डेटा आपल्या सरकारसोबत शेअर करण्यास बंधनकारक आहे असे तज्ञ सांगतात. याचा वापर सायबर हल्ल्यासाठी होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. यास सरकारने दुजोरा दिलेला नाही, मात्र असे कोणते चायनीज ऍप आहेत जे सुरक्षेच्या दृष्टीने घातक आहेत ते पाहू…
1. टिकटॉक (TikTok)
2. हॅलो (Helo)
3. यूसी ब्राउजर (UC Browser)
4. यूसी न्यूज (UC News)
5. शेअर इट (Sharit)
6. लाइकी (Likee)
7. 360 सिक्योरिटी (360 Security)
8. न्यूज डॉग (NewsDog)
9. शिन (SHEIN)
10. विगो वीडियो (Vigo Video)
11. वी चॅट (WeChat)
12. वीबो (Weibo)
13. जूम (ZOOM)
14. वीबो लाइव (Vibo live)
15. क्लब फैक्टरी (Club Factory)
16. शेंडर (Xender)
17. ब्यूटी प्लस (BeautyPlus)
18. क्वाई (Kwai)
19. रोमवी (ROMWE)
20. फोटो वंडर (Photo Wonder)
21. एपीयूएस ब्राउजर (APUS Browser)
22. वीवा वीडियो (VivaVideo)
23. क्यूयू वीडियो इंक (QU Video Inc)
24. परफेक्ट कोर्प (Perfect Corp)
25. सीएम ब्राउजर (CM Browser)
26. वायरस क्लीनर (Virus Cleaner)
27. हाई सिक्योरिटी लैब (Hi Security Lab)
28. एमआई कम्यूनिटी (Mi Community)
29. डीयू रिकाॅर्डर (DU recorder)
30. यूकैम मेकअप (YouCam Makeup)
31. एमआई स्टोर (Mi Store)
32. डीयू बैटरी सेवर (DU Battery Saver)
33. डीयू ब्राउजर (DU Browser)
34. डीयू क्लीनर (DU Cleaner)
35. डीयू प्राइवेसी (DU Privacy)
36. क्लीन मास्टर (Clean Master)
37. बैदू ट्रांसलेट (Baidu Translate)
38. बैदू मैप वंडर कैमरा (Baidu Map Wonder Camera)
39. ईएस फाइल एक्पलोरर (ES File Explorer)
40. क्यूक्यू इंटरनेशनल (QQ International)
41. क्यूक्यू लाॅन्चर (QQ Launcher)
42. क्यूक्यू सिक्योरिटी सेंटर (QQ Security Centre)
43. क्यूक्यू प्लेयर (QQ Player)
44. क्यूक्यू म्यूजिक-क्यूक्यू मेल (QQ Music QQ Mail)
45. क्यूक्यू न्यूज फीड (QQ NewsFeed)
46. वी सिंक (WeSync)सेल्फी सिटी (SelfieCity)
47. क्लैश ऑफ किंग्स मेल मास्टर (Clash of Kings Mail Master)
48. एमआई वीडियो काॅल-शाओमी (Mi Video call-Xiaomi)
49. पैरेलल स्पेस (Parallel Space)
50. शेन (Shien)























































