दीपिकाने टिपले मुंबईचे विहंगम दृश्य!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या आपला पती रणवीर सिंह याच्यासोबत क्वॉलिटी टाइम घालवत आहे. वेगवेगळे व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत ती आपल्या रोजच्या ऍक्टिव्हिटी चाहत्यांसोबत शेयर करत असते. नुकतेच दीपिकाने आपल्या घरातून मुंबईचे विहंगम दृश्य कॅमेरात टिपले आहे. हा फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेयर केला आहे.

या फोटोला तिने मॅक्झिमम सिटी असे नाव दिले असून सोबत नो फिल्टर असे हॅशटॅग दिले आहे. या फोटोत मुंबईतील टोलेजंग इमारती, वांद्रे-वरळी सी लिंक आणि ढगाळ वातावरण दिसत आहे. अनेकांनी तिच्या या फोटोग्राफी कौशल्याचे कौतुक करत तिला हार्ट इमोजी दिल्या आहेत. लॉकडाऊनमध्येही दीपिका बॉलीवूडची बिझी अभिनेत्री ठरली आहे. या काळात तिने निर्मात्यांकडून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे क्रिप्ट ऐकल्या आहेत.