
‘यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गा’वरील टोलवसुलीच्या देय रकमेपैकी 6 हजार 500 कोटी रुपयांचा पहिला हप्ता ‘आयआरबी इफ्रास्ट्रक्चर’ कंपनीकडून राज्य सरकारला प्रदान करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एमएसआरडीसी आणि राज्य सरकारच्या वतीने मंत्रालयात या रकमेचा औपचारिक स्वीकार केला. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे यामध्ये सहभागी झाले होते. नगरविकास तथा सार्वजनिक उपक्रममंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव अजोय मेहता, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, आयआरबी इफ्रास्ट्रक्चर’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक वीरेंद्र म्हैसकर, स्टेट बँक आणि युनियन बँकेचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
‘यशकंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गा’वरील टोल वसुलीसाठी ‘आयआरबी इफ्रास्ट्रक्चर’ कंपनी आणि महाराष्ट्र राज्य रस्ते किकास महामंडळात (एमएसआरडीसी) पथकरवसुलीसाठी 8 हजार 262 कोटी रुपयांचा करार झाला असून पहिल्या वर्षी आयआरबीकडून सरकारला 6 हजार 500 कोटी, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी प्रत्येकी 850 कोटी तसेच चौथ्या वर्षी 62 कोटी मिळणार आहेत.





























































