… हे तर ‘सरेंडर मोदी’, राहुल गांधी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
narendra-modi-rahul-gandhi

लडाख सीमेवर गलवान खोऱ्यात चीनसोबत झालेल्या हिंसक झटापटीत हिंदुस्थानचे 20 जवान हुतात्मा झाले. तेव्हापासून काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर निशाणा साधत आहेत. रविवारी पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी मोदींवर टीका केली.

नरेंद्र मोदी हे खरे तर ‘सरेंडर मोदी’ आहेत असे ट्विट राहुल गांधी यांनी केले. यासोबत राहुल गांधी यांनी ‘जपान टाइम्स’चा एक लेख शेअर केला आहे. ‘जपान टाइम्स’ने हिंदुस्थानची सध्याची स्थिती चीनला चुचकारण्याची आहे, असे म्हटले आहे.

याआधी पंतप्रधान मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीत केलेल्या विधानावरून राहुल गांधी यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. पंतप्रधान मोदी यांनी हिंदुस्थानच्या सीमेत कोणीही घुसखोरी केली नाही आणि कोणीही आपल्या चौकीवर कब्जा केलेला नाही, असे मोदी म्हणाले होते. तसेच हिंदुस्थानच्या जवानांनी पराक्रम गाजवला, असेही मोदी म्हणाले. यावर राहुल गांधी यांनी सवाल उपस्थित केला. जिथे हिंदुस्थानचे जवान हुतात्मा झाले ती जमीन चीनची होती तर त्यांना का मारण्यात आले? त्यांना नक्की कुठे मारण्यात आले, असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला होता.

भाजपचा पलटवार
राहुल गांधी विनाकारण वाद निर्माण करत आहेत. अशा वेळी देशहितासाठी सर्वपक्षांनी एकत्र यायला हवे. रही राजकारण करण्याची वेळ नाही, असे म्हणत भाजपने राहुल गांधी यांच्यावर पलटवार केला.