तिरंगा जाळून व्हिडीओ टाकला टिकटॉकवर, चार जणांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशमध्ये तिरंगा जाळून त्याचा व्हिडीओ टिकटॉकवर टाकल्याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी एका आरोपीला अटक करण्यात आली असून तीन आरोपी फरार आहेत.

लखनौच्या तिकाईत राय तलावाजवळ रवी कांत हा तरुण सायकल चालवत होता. तेव्हा चार मुलं तिरंगा जाळत होते आणि त्याचा व्हिडीओ काढत होते. तेव्हा रवीने पोलिसांना बोलावले. तेव्हा चारपैकी तीन मुलं पळून गेली. पोलिसांच्या हातात एक अल्पवयीन आरोपी लागला. पोलिसांनी चारही मुलांच्या विरोधात देशद्रोहासह सहा गुन्हे दाखल केले आहेत. अटक केलेला आरोपी अल्पवयीन आहे. पोलीस उर्वरित तीन आरोपींचा शोध घेत आहेत.